भाजप कार्यकर्त्याचा गडकरींसमोर आत्मदहनाचा प्रयत्न

March 29, 2010 7:46 AM0 commentsViews: 2

29 मार्चभाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांच्या सोलापुरातमधील भर कार्यक्रमात भाजपच्या एका कार्यकर्त्याने स्वत:ला पेटवून घेतले आहे. सुनील गोलकोंडा असे या कार्यकर्त्याचे नाव आहे. सभागृहातील इतर कार्यकर्ते आणि पोलिसांनी त्याला विझवले. गोलकोंडा सभागृहात मागच्या रांगेत बसला होता. गडकरी यांचा सत्कार सुरू होताच त्याने पेटवून घेतले आणि तो सभागृहाच्या मध्यभागी आला. तो स्टेजकडेही पेटलेल्या अवस्थेत पळत निघाला होता. पण कार्यकर्त्यांनी त्याला रोखून आग विझवली आणि त्याला दवाखान्यात घेऊन गेले. या प्रकारात गोलकोंडा 15 ते 20 टक्के भाजला आहे. दवाखान्यात भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे.

close