बिझनेस मॉर्नंग अपडेट

October 13, 2008 9:57 AM0 commentsViews: 6

13 सप्टेंबर, मुंबई – एशियन मार्केट्सकडे संमिश्र प्रकारचं ट्रेडिंग दिसत आहे. हँगसेंगसारखे इंडेक्स दोन टक्क्यांनी घसरले आहेत तर शांघायमध्ये ट्रेडिंग बर्‍यापैकी पॉझिटिव्ह लेव्हलला आहे. जपानमध्ये आज राष्ट्रीय सुट्टी असल्यानं त्यांची मार्केट्स बंद आहेत. युरोपियन मार्केट्स देखील निगेटिव्ह लेव्हलला बंद झाली आहेत. अमेरिकन मार्केट्सकडे बघितलं तर तिथे शुक्रवारी बराच मोठा चढ-उतार दिसला होता , तिथे नॅसडॅकनं पॉझिटिव्ह क्लोजिंग दाखवंल होतं. भारतीय शेअरमार्केटमध्ये बघितलं तर सेन्सेक्स शुक्रवारी साडेदहा हजारांच्या आसपास बंद झाला होता. आज पॉझिटिव्ह ओपनिंग दाखवत तो 344 अंश वर आला आणि 10872 वर ओपन झाला. निफ्टी 80 पॉइंट्सनी वर जाऊन 3383 वर ओपन झाला आहे.

close