मराठवाड्यात यंदाही कृत्रिम पावसाचा प्रयोग ?

May 25, 2016 8:39 PM0 commentsViews:

औरंगाबाद – 25 मे : दुष्काळाग्रस्त मराठवाड्यात पुन्हा कृत्रिम पाऊस पाडण्याची तयारी प्रशासनानं सुरू केली आहे. मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आपातकालीन विभागाची बैठक झाली. त्यावेळी या विषयावर चर्चा झाली.rain3433

कृत्रिम पावसासाठी लागणारे सी-डॉप्लर रडार तयार आहे. गेल्या वर्षी हा प्रयोग केला मात्र उशिरा सुरू केल्यानं फसला होता. यंदा मात्र जून पासूनच या प्रयोगाला सुरू करण्याची तयारी आहे. कारण, जून मध्ये मोठ्या प्रमाणात ढग आकाशात असतात आणि त्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असते. बाष्प असलेल्या ढगांमध्ये विमानाच्या माध्यमातून क्लाउड-सिडींग केलं जातं ज्यामुळं ढगांमध्ये असलेले पाणी जमिनीवर पाडलं जातं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा