मिहान प्रकल्पावर अवकळा

March 29, 2010 8:07 AM0 commentsViews: 9

प्रशांत कोरटकर, नागपूर 29 मार्चराज्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या नागपूरच्या मिहान प्रकल्पावर सध्या अवकळा आली आहे. इथे ना नवी गुंतवणूक होत आहे, ना प्रकल्पाचे काम सुरू आहे. यामुळे भाजपसोबत काँग्रेसच्या नेत्यांनीही यावर मुख्यमंत्र्यांना टार्गेट केले आहे.दोन वर्षांपूर्वी नागपूर विमातळाच्या परिसरात चार हजार हेक्टरवर मिहान प्रकल्पाचे काम जोरात सुरू झाले. सत्ताधार्‍यांसोबतच भाजपनेही या कामाला पाठिंबा दिला. सगळे आलबेल वाटत असतानाच मुख्यमंत्री बदलले. आणि प्रकल्प रेंगाळला.या प्रकल्पाचे श्रेय घेण्यावरून बरेच दिवस केंद्र आणि राज्यसरकारमध्ये लढाई सुरू होती. या प्रकल्पांतर्गत विमानतळ परिसरातील चौदा गावांच्या साडेचार हजार हेक्टर जमिनींवर मल्टी मोडल कार्गा अँण्ड पँसेजर हब यासोबतच एसईझेड करण्यासाठी 2004 मध्ये कामाला सुरूवात झाली. 3000 कोटींची गुंतवणूक , 1500कोटींचे विकास रस्ते आणि महत्वाच्या गोष्टी तयार करून महाराष्ट्र सरकारने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला. यात सत्यम, एल अँन्ड टी, बोईंग, डेक्कन, डीएलएफ, विप्रो, डी. वाय. पाटील सांरख्या संस्थांनी गुंतवणूक करायला सुरूवात केली. ड्यूकने तर आपल्या एमआरओ प्रकल्पाचे भूमीपूजनही केले. पण नंतर सत्यम डीएलएफ आणि ड्यूकने नागपुरातून काढता पाय घेतला.यानंतर इथे जमिनीचे भाव वाढले. इतर सोयीसुविधा वाढल्या. पण प्रकल्पाचे काम मंदावले.मिहानच्या भरवशावर लोकांना विकासाचे स्वप्न दाखवले गेले होते. पण आता यात राजकारण आणले जात आहे. यातून निर्माण झालेल्या वादामुळे हा प्रकल्प अडगळीत जातो की काय अशी भीती निर्माण झाली आहे.

close