‘काँग्रेसला आत्मचिंतनाची गरज’

May 25, 2016 9:34 PM0 commentsViews:

नाशिक -25 मे : नुकत्याच झालेल्या 5 राज्यातल्या निवडणुकांमुळे प्रादेशिक पक्षांचा आत्मविश्वास वाढलाय. हा भाजपला दिलासा देणारा आहे आणि काँग्रेसला आत्मचिंतन करायला लावणारा आहे, असं मत आयबीएन लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांनी व्यक्त केलं. सांस्कृतिक नाशिकचं वैभव म्हणून ओळख असलेली वसंत व्याख्यानमाला सध्या नाशिकमध्ये सुरू आहे. या व्याख्यानमालेत महेश म्हात्रे यांनी आपले विचार मांडले. यंदाच्या व्याख्यानमालेचं हे 95 वं वर्ष होतं. कला, क्रीडा, सांस्कृतिक,सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांचे विचार या व्याख्यानमालेच्या निमित्तानं ऐकायला मिळतात. सोशल मीडियाच्या माध्यमातून तयार झालेलं व्यासपीठ आणि प्रसारमाध्यमांची जबाबदारी यावरही महेश म्हात्रे यांनी आपले विचार मांडले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा