विधान परिषदेसाठी भाजपची यादी निश्चित, मित्रपक्षांना 3 जागा ?

May 25, 2016 11:25 PM0 commentsViews:

25 मे : विधानपरिषदेच्या आखाड्यात भाजपला अखेर मित्र पक्षांची आठवण आलीये. भाजपकडून नावाची यादी जवळपास निश्चित झाली असून आठवले गट, विनायक मेटे आणि सदाभाऊ खोत यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे.

vidhan_parishd_bjpआगामी विधान परिषदेच्या निवडणुकांसाठी भाजपने मोर्चेबांधणी सुरू केलीये. भाजपने नावाची यादी जवळपास निश्चित केली आहे. भाजपच्या कोट्यातून 5 आमदार निवडून येवू शकतात. यामध्ये 3 जागा मित्रपक्षाच्या वाट्याला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये एक
आठवले गटाला एक जागा, विनायक मेटे आणि स्वाभिमानीचे सदाभाऊ खोत यांना आमदारकी मिळण्याची शक्यता आहे. भाजपकडून दोन जणांना उमेदवारी मिळणार आहे. यामध्ये सुरजित सिंह ठाकूर यांची उमेदवारी जवळपास निश्चित आहे, तर दुसर्‍या जागेसाठी मुख्य प्रवक्ते माधव भंडारी आणि कोकणातील माजी आमदार प्रमोद जठार यांच्यात चुरस आहे.

आखाडा विधान परिषदेचा

भाजप कोट्याच्या 5 जागा
भाजपला 2, मित्रपक्षांना 3 जागा

भाजपकडून यांना उमेदवारी ?
1. आठवले गटाला एक
2. विनायक मेटे (शिवसंग्राम पक्ष)
3. सदाभाऊ खोत (स्वाभिमानी शेतकरी संघटना)
4. सुजितसिंह ठाकूर (भाजप)
5. माधव भंडारी आणि प्रमोद जठार (भाजप) यांच्यापैकी एकाला उमेदवारी


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा