दिल्ली आणि कोलकाता आमने सामने

March 29, 2010 8:14 AM0 commentsViews: 1

29 मार्च आयपीएलमध्ये आज दिल्ली डेअरडेव्हिल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमने सामने येतील. दोन्ही टीमची स्पर्धेतली ही सातवी मॅच असणार आहे. विशेष म्हणजे दोन्ही टीमच्या खात्यात तीन विजय आणि तीन पराभव आहेत. त्यामुळे ही मॅच जिंकणे पॉईंट टेबलमध्ये आघाडी घेण्यासाठी दोन्ही टीमसाठी महत्वाचे ठरणार आहे. दिल्लीची मदार असेल ती वीरेंद्र सेहवाग, ऍबी डिव्हिलिअर्स, डेव्हिड वॉर्नर आणि दिनेश कार्तिवर. तर कोलकाताची बॅटिंगही चांगलीच भक्कम आहे. त्यामुळे ही मॅच चांगली चुरशीची होणार आहे.

close