मुंबईत उपनगरात पावसाच्या हलक्या सरी, गारव्याने मुंबईकर सुखावले

May 26, 2016 9:30 AM0 commentsViews:

Mumbai Rain213

26 मे  : पूर्व उपनगरात काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या काही दिवसात कडाक्याच्या उन्हामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसामुळे काही प्रमाणात का होईना दिलासा मिळाला आहे.

सध्या मुंबईत सर्वत्र ढगाळ वातावरण असून गुरूवारी सकाळी मुंबईसह उपनगरांत पावसाच्या हलक्या सरी कोसळल्याने वातारवणात गारवा आला आहे. पण अचानक आलेल्या पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ उडाली होती.

दरम्यान, राज्यात यंदा सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा