पाहुणचार तृतीय पंथीयांचा

March 29, 2010 8:29 AM0 commentsViews: 14

रोहिणी गोसावी, मुंबई29 मार्चतृतीय पंथीयांना आपल्या समाजात सन्मानाचे स्थान दिले जात नाही. पण 'अनाम प्रेम' ही संस्था अशाच लोकांना आपल्यात सामावून घेण्यासाठी काम करत आहे. त्यासाठी संस्थेने एक आगळा-वेगळा प्रयोग केला. तृतीयपंथीयांना मुंबईच्या काही कुटुंबांमध्ये पाहुणचारासाठी पाठवण्याचा… तृतीयपंथी कायम समाजापासून दुरावलेले… घर, कुटुंब आणि आपल्या माणसांनीच झिडकारलेले. या वंचितांना समाजात आणण्याचा प्रयत्न करत आहे अनाम प्रेम ही संस्था. मुंबईतील 13 कुटुंबांमध्ये त्यांनी एक संध्याकाळी घालवली. आणि तीही त्या कुटुंबाकडून पाहुणचार घेत. सामान्य माणसांच्या मनातली तृतीय पंथीयांची भीती घालवण्याचा हा एक प्रयत्न… तुमचा विश्वास बसणार नाही, यातील काही सॉफ्टवेअर इंजीनियर आहेत. तर काही फॅशन डिझायनर, पण तृतीयपंथी असल्याने त्यांना नोकरी मिळत नाही. पण आपल्याला फक्त प्रेम, सन्मान मिळावा आणि महत्त्वाचे म्हणजे माणूस म्हणून वागवले जावे एवढीच त्यांची अपेक्षा आहे.दुरावलेल्यांना पुन्हा समाजात आणण्याचा अनाम प्रेमचा हा प्रयत्न, आता गरज आहे ती हा प्रयत्नाला प्रतिसाद देण्याची…

close