नलिनीच्या सुटकेची शक्यता

March 29, 2010 8:36 AM0 commentsViews: 1

29 मार्चराजीव गांधींच्या हत्येप्रकरणी गेल्या 19 वर्षांपासून शिक्षा भोगणार्‍या नलिनीचा तुरुंगवास संपण्याची शक्यता आहे. नलिनीची गेल्या 19 वर्षांची वागणूक चांगली आहे. त्यामुळे तिला शिक्षेत सूट देण्यात यावी, अशी याचिका दाखल करण्यात आली होती. यावर तामिळनाडू सरकार आज निर्णय घेण्याची शक्यता आहे.नलिनीला देण्यात आलेली मृत्यूदंडाच्या शिक्षेचे रुपांतर सोनिया गांधीच्या हस्तक्षेपानंतर जन्मठेपेत करण्यात आले होते. तुरुंगात असताना प्रियांका गांधींनाही नलिनीची भेट घेतली होती.

close