भुजबळांसह 12 जणांविरोधात एसीबीकडून गुन्हा दाखल

May 26, 2016 11:52 PM0 commentsViews:

bhujbal discharge26 मे : माजी सार्वजनिक बांधकाम छगन भुजबळ आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ झालीये. बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी भुजबळांसह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केलीये.

पंकज भुजबळ,समीर भुजबळ, सुनील नाईक आणि जगदीश प्रसाद पुरोहित यांच्या मदतीनं त्यांनी स्वतःच्या नियंत्रणात असलेल्या वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये बनावट पद्धतीने शेयर्सच्या वाढीव प्रीमियमच्या माध्यमातून विक्री केल्याचं लक्षात येतंय. त्याचबरोबर 1999 ते 2014 पर्यंत त्यांच्याकड़े 1,49,65,801 इतकी संपत्ती होती आणि ही संपत्ती कायदेशीर उत्पन्नेच्या तुलनेत 32 टक्के जास्त आहे. तपासात ही बाब ही समोर आलीये तसंच, भुजबळांनी लोकसेवा कालावधीत 204 कोटी 73 लाख 38 हजार 801 रुपये अशी संपदा प्राप्त केली होती.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा