ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांचे निधन

May 27, 2016 8:43 AM0 commentsViews:

R.G Jadhav

26 मे :  ज्येष्ठ समीक्षक प्रा. रा. ग. जाधव यांचे आज सकाळी पुण्यातील राहत्या घरी निधन झालं. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12.30 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

औरंगाबाद येथील २००४ सालातल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. मराठी विश्वकोषामध्ये मानव्य विद्याविषयक लेखनाचे प्रमुख संपादक म्हणून ही त्यांनी जबाबदारी सांभळली होती. त्यांनी लिहलेली काव्य समीक्षेतील धुळाक्षरे, खेळीमेळी (ललित), निवडक समीक्षा, ‘समीक्षेतील अवतरणे’, निळी पहाट, निळी क्षितिजे, निळे पाणी, अशी त्यांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत.

गेल्याचवर्षी प्रा. रा.ग. जाधव यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराने गौरविण्यात आले होते.

 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा