नाशिकमध्ये तृप्ती देसाई यांच्या कारवर हल्ला

May 27, 2016 10:08 AM0 commentsViews:

Trupti Desai stopped from entering Kapaleshwar Temple in Nasik

27  मे : भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांच्या कारवर नाशिकमधील पंचवटी भागात काल (गुरुवारी) मध्यरात्री बाराच्या सुमारास बाईक्सवरून आलेल्या 20 ते 25 जणांनी दगडफेक केली. त्यात कारच्या सर्व काचा फुटल्या आहेत. या हल्ल्यात देसाई आणि काही महिला कार्यकर्त्या जखमी झाल्या असून हल्लेखोरांनी माझ्यावर ऍसिड फेकण्याचा प्रयत्न केला, असा गंभीर आरोप देसाई यांनी केला.

कपालेश्वर मंदिराच्या गाभार्‍यात प्रवेश करण्यावर तृप्ती देसाई ठाम असल्याने नाशकात तणावाचं वातावरण आहे. देसाई यांनी काल दुसर्‍यांदा कपालेश्वर मंदिरात जाऊन गाभार्‍यात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना त्याआधीच पोलीस आणि भाविकांनी त्यांना रोखलं. त्यावेळी देसाई यांच्यावर चप्पलफेकही करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी देसाई यांना ताब्यात घेत परिस्थिती नियंत्रणात आणली होती. दरम्यान, पोलिसांनी देसाई आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना सोडल्यानंतर रात्री त्यांना लक्ष्य करण्यात आलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा