कुर्ल्यात दोन गटात हाणामारी, तीन जण गंभीर

May 27, 2016 1:45 PM1 commentViews:

crime

27  मे :  कुर्ला पश्चिम इथल्या सुंदर बाग परिसरात काल (गुरूवारी) रात्री दोन गटात जोरदार हाणामारी झाली. यात एकमेकांवर चाकू आणि गुप्तीने वार केले. या घटनेत तीन जण जखमी असून त्यातील दोन जणांची प्रकृती नाजूक आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

विकास, नीरज आणि तेजस अशी त्या तिघांची नावं आहेत. या प्रकरणी एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनूसार विकास, नीरज आणि तेजस रस्त्यावर नशापाणी करत होते. त्यावेळी चार ते पाच जण त्या ठिकाणी आले. त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर आलेल्या टोळक्याने नीरज आणि विकास यांच्यावर चाकू हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेनंतर रस्त्यावर सर्वत्र रक्त सांडलेले दिसत आहे.

या घटनेची माहिती समजूनही पोलिसांनी घाटकोपर आणि साकिनाका हद्दीवरून वाद घातला. हल्ला झालेले ठिकाण साकिनाका तर जीव वाचवण्यासाठी जखमी पळत आले ते घाटकोपर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येते. त्यामुळे तक्रार नोंदवण्यास उशीर झाला. दरम्यान हल्लेखोर फरार झाले.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Ramchandra Chavan

    कोणत्याही पोलिसात तक्रार करू शकतो हा नियम असताना पोलिसांनी हद्दीचा वाद का काढला