मोबाईल रिचार्जसाठी पैसे दिले नाही म्हणून मुलाने केला वडिलांचा खून

May 27, 2016 4:18 PM0 commentsViews:

crime sceneबुलडाणा – 27 मे : मोबाईलच्या रिचार्जसाठी आपल्या सख्ख्या वडिलांचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार बुलडाण्यात घडलाय. बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यात खडदखेड गावातली ही घटना आहे. सोनल मानकर असं या आरोपी मुलाचं नाव आहे.

मौजमजा करण्यासाठी आणि मोबाईलमध्ये बॅलन्स टाकण्यासाठी आपल्या वडिलांकडे पैशांची मागणी केली. त्याला वडिलांनी नकार दिला. याचा राग मनात धरुन आपल्या 2 मित्रांबरोबर सोनल यानं त्यांना बेदम मारहाण केली. त्यात वडिलांचा मृत्यू झाला. विठ्ठल मानकर असं मृत वडिलांचं नाव आहे. वडिलांशी पटत नसल्याने सोनल हा आईबरोबर तिच्या माहेरी राहत होता. अधूनमधून खर्चाला पैसे घेण्यासाठी तो वडिलांकडे यायचा. पण यावेळी वडिलांनी पैसे द्यायला नकार दिल्यानं त्यानं हे कृत्य केलं. याप्रकरणी सोनल आणि त्याच्या 3 मित्रांना अटक करण्यात आलीये. तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा