मोत्यांच्या शेतीवर चोरांचा डल्ला, 7 लाखांचे मोती लंपास

May 27, 2016 4:50 PM0 commentsViews:

गडचिरोली – 27 मे : चोर काय चोरी करू शकतो याचा काही नेम नाही. गडचिरोलीत मोत्यासारखी खरी खरी शेती पिकवणार्‍या संजय गंडाटे यांनाही चोरांचा फटका बसला असून चोरांनी गडाटे यांच्या शेतातील 7 लाख रुपये किंमतीचे मोती चोरले आहे.

gadchiroli motiराजे-महाराजांची शान असलेला मोती सगळ्यांना हवाहवास वाटतो. समुद्राच्या तळाला शिंपल्यात मिळणारे मोती आता गडचिरोली सारख्या दुर्गम भागात पिकवण्याची किमया संजय गंडाटे या तरुणाने करुन दाखवली. विशेष म्हणजे संजय यांनी गोड पाण्यात लाखमोलाच्या मोत्यांचं पिक घेतलंय. या मोत्यांचा भाव प्रति नग 500 ते 700 रुपये असून वर्षाकाठी ते 11 ते 12 लाखांचं उत्पन्न घेतात. त्यांच्या या प्रयोगाचं राज्यभरात कौतुक झालं. 2012 पासून गंडाटे यांनी 10 बाय 10 आणि 8 ते 10 फूट शेतात मोत्यांचं पिकं घेतात. त्यांचं हे वैभव संपन्न यश चोरांच्या नजरी पडलं. गुरुवारी रात्री शेतात असलेल्या कृत्रिम तलावातील अज्ञात चोरट्यांनी सात लाख किंमतीचे 1200 शिंपल्यासह 2400 मोत्यांची चोरी केली. संजय गंडाटे यांनी गडचिरोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केलीये. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास सुरू केला असून शासनाकडून आर्थिक मदत करण्याची मागणी संजय गंडाटे यांनी केलीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा