सेनेच्या शिववडाला भाजप देणार टक्कर, उभारणार ‘नमो टी स्टॉल’ !

May 27, 2016 5:12 PM0 commentsViews:

मुंबई – 27 मे : शिवसेनेच्या शिववडाला टक्कर देण्यासाठी आता भाजप लवकरच नमो टी स्टॉल आणि फूड-स्टॉल मुंबईत सुरू करणार आहे. या प्रस्तावाला तत्त्वत:हा मंजुरीही देण्यात आलीये. त्यामुळे सेना भाजपमधली वादावादी आता रस्त्यावर आलीये.

namo_tea_stallशिवसेनेच्या वडापावला मात देण्यासाठी आता भाजपचा नमो टी-स्टॉल आणि फूड स्टॉल सुरू करण्याचा प्रस्ताव देण्यात आलाय. स्थापत्य समिती अध्यक्ष प्रकाश गंगाधरे यांनी मांडलेल्या प्रस्तावाला परवानगी मिळाली तर मुंबई शिव वडापावनंतर नमो टी स्टॉल ही दिसून येतील. मुख्य म्हणजे हा स्टॉल सुरू करण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून बेरोजगारांना बँकेकडून कर्ज मिळवून देण्याची तरतूद असल्याचं या प्रस्तावात म्हटलंय. पालिकेनं या टी स्टॉलला परवाने देऊन त्यांच्याकडून अधिकृतरित्या भाडं आकारावं असं ही या प्रस्तावात नमूद करण्यात आलं आहे. भाजपच्या गटनेत्यांच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. परंतु, नमो टी स्टॉल हे मुंबई पुरते मर्यादित नाही. देशभरात ज्या ज्या ठिकाणी हॉकर झोन नाही अशा ठिकाणी हे नमो टी स्टॉल उभारले जाणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा