डोंबिवली स्फोटात कंपनीचे मालक वाकटकर कुटुंबातील तिघांचा मृत्यू

May 27, 2016 6:20 PM0 commentsViews:

डोंबिवली – 27 मे : डोंबिवलीमध्ये प्रोबेस केमिकल कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटानंतर कंपनीचे मालक विश्वास वाकटकर कुटंबिलांवरही दुखाचा डोंगर कोसळलाय. या भीषण स्फोटात वाकटकर कुटुंबातील तिघांचा मृत्यू झालाय.wakatkar_family

डोंबिवलीतील प्रोबेस इंटरप्रायझेस कंपनीत गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झालाय. पण, या स्फोटात कंपनीचे मालक डॉ.विश्वास वाकटकर यांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय. नंदन वाकटकर आणि सुमीत वाकटकर अशी त्यांची नावं आहेत. वाकटकर यांची सून स्नेहल सुनील वाकटकर हिचाही मृतदेह आज सापडला आहे. मालक विश्वास वाकटकर यांच्या घरातल्या तिघांचा या स्फोटात मृत्यू झाला आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा