‘सैराट’ मराठ्याची लायकी काढणारा,तरीही मराठे शांत का? -नितेश राणे

May 27, 2016 7:06 PM2 commentsViews:

सोलापूर – 27 मे : सैराट सिनेमा आज मराठी चित्रपट सृष्टीत मैलाचा दगड ठरलाय. सैराटच्या यशाचं सर्वच स्तरातून कौतूक होतंय तर कुठे नाराजीची सूरही उमटत आहे. आता यात काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी उडी घेतलीये. मराठ्यांची लायकी काढणारा चित्रपट 80 कोटी कमावतो मात्र बाजीराव मस्तानीमध्ये काशीबाई नाचल्याचं दाखवल्यावर ब्राह्मण समाज उठून उभा राहतो, मग मराठा समाज का शांत राहतो असं चिथावणीखोर वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय. ते सोलापुरात बोलत होते.
rane_saiart_4
सोलापुरात मराठा आरक्षण एल्गार मेळावा पार पडला. मराठा आरक्षण मागणीसाठी हा मेळावा घेण्यात आला होता. यावेळी काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं तसंच राज्यभर गाजलेल्या सैराट चित्रपटावरही नितेश राणे यांनी टीका केलीय.

मराठी चित्रपट सृष्टीत सैराट हा अतिशय चांगला सिनेमा आहे. त्याने कमाईही केली ही पण मोठी गोष्टी आहे. पण कला वेगळी आणि विषय वेगळा असतो. मराठ्यांची लायकी काढणारा सैराट सारखा चित्रपट 80 कोटींची कमाई करतो. तरीही मराठा समाज शांत बसतो. दुसरीकडे मात्र काशीबाई नाचवल्याचं दाखवलं की सगळं राज्य डोक्यावर घेतलं जात असल्याची टीका नितेश राणे यांनी केलीय.

तसंच यावेळी बोलताना नितेश राणे विनोद तावडे आणि विनायक मेटे यांच्यावरही घसरले. मराठा आरक्षण प्रकरणी तावडेंनी काय केलंय. मराठा आरक्षण देणार तर कधी देणार यावर तावडे बोलायला तयार नाही. यांचं अच्छे दिन सारखं झालंय. त्याची काही तारिख नाही तसंच आरक्षणाबद्दलही काही तारिख तावडे सांगत नाही अशी टीका राणेंनी केली. आपल्यातलाच एक माणूस तिकडे गेलाय. विनायक मेटे म्हणा किंवा चाटे म्हणा..त्यांनी आपलं आडनाव बदलून विनायक चाटे करावं ते योग्य राहिल अशी टीका राणेंनी केली. तसंच बाबासाहेब पुरंदरे सारख्या माणसाला महाराष्ट्रभूषण पुरस्कार दिलाय त्यावेळी मेटे हे पहिल्या रांगेत तर तावडे व्यासपीठावर होते. हे लोकं काय मराठा आरक्षण देणार असा खोचक टोलाही राणेंनी लगावला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


  • Ajit Deshmukh

    Nitesh Rane sahebanche pratham abhar. mala ek gost ankhi ek ashi watte ki anterjatiy vivahawaril chitrapatala lokani bharbharun yash dila tyapramane lokna antarjatiy vivah chaltat pan school college mdhe admishan sathi matra pratekjan apal reservation nusar admishan wahv ashi watat. jar jatiant pahije asel tar resevation chi paddat pratham band zali pahije. nuste anterjatiy viwah karun jatiannt honar ya samjutit rahal tar ya deshat ek ediwas 100% Arajakta nirman houn bharat punrataha nakslet zalyashiya rahanar nahi.

  • digoo talekar

    जेव्हा याचो बापूस ‘आरक्षणाच्या भिकेसाठी ‘ सगळ्या मराठ्यांका चिथवता तेव्हा नाय जात रे लायकी ?

    उगाच काय तरी भागल मारता #@xx ……

    आमका (कोकणातल्या मराठ्यांका) नक्की काय व्हया, ता ना ह्याच्या बापसाक कळला ना भावाक