हिमांशू रॉय, मारियांनी पदभार स्वीकारला

March 29, 2010 9:00 AM0 commentsViews: 31

29 मार्च आज हिमांशू रॉय यांनी क्राईम ब्रँचचे जॉईंट सीपी म्हणून सूत्रे स्वीकारली आहेत. तर राकेश मारिया यांनीही एटीएसच्या प्रमुखपदाचा पदभार स्वीकारला आहे. एटीएसच्या प्रमुखपदी राकेश मारिया यांची नियुक्ती झाल्यावर त्यांच्या जागी हिमांशू रॉय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हिमांशू रॉय यापूर्वी कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे जॉईंट सीपी म्हणून काम पाहत होते. एटीएस प्रमुखपदी यापूर्वी के. पी. रघुवंशी होते. पण मीडियाला पुणे बॉंम्बस्फोटातील माहिती दिल्याने केंद्रीय गृहमंत्रालयाने त्यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांच्या जागी आता बाँम्बस्फोटाच्या तपासाचा दांडगा अनुभव असणार्‍या राकेश मारिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

close