जामीन मिळू नये म्हणून खोट्या केसेस दाखल-भुजबळ

May 27, 2016 7:43 PM0 commentsViews:

Chagan bhujbal21327 मे : भुजबळ कुंटुबियांना उद्धवस्त करण्याच्या विरोधकांचा हा डाव असून जामीन मिळू नये म्हणून खोट्या केसेस केल्या जात आहे असा आरोप माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय.

भुजबळांनी पुन्हा एकदा आर्थर रोड जेलमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलंय. या पत्रात भुजबळांनी विरोधकांवर टीका केलीये. तसंच 50 वर्षांची राजकीय कारकीर्द पणाला लागलीये आणि पाठीराख्याच्या जोरावर अंतिम क्षणापर्यंत लढा देणार असंही भुजबळांनी स्पष्ट केलं. या वयात किती आणि कसं लढावं असा सवाल भुजबळांनी सरकारला विचारलाय.

दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणी छगन भुजबळ यांच्या जामीन अर्जावर पुढील सुनावणी 8 जूनला होणार आहे. भुजबळांचा मेडिकल रिपोर्ट हायकोर्टाला आज सादर करण्यात आला. काल भुजबळांसह 12 जणांवर बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. लाचलुटपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आली होती. याची पुढची सुनावणी 8 जूनला होणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा