‘शिकारी खुद शिकार हो गया’, पाहा एका कावळ्याची फजिती

May 27, 2016 9:11 PM0 commentsViews:

नालासोपारा – 27 मे : शिकारीला आला आणि जाळ्यात अडकला अशी अवस्था नालासोपार्‍यात एका कावळ्याची झालीय. उंदीर पकडण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ट्रबल गमला अडकलेला उंदिराची शिकार करण्यासाठी कावळा आला. पण माऊस पॅडला तो कावळा असा अडकला की त्याला वाचवण्यासाठी थेट अग्निशमन दलाच्या जवानांना यावं लागलं. उंदिरावर ताव मारण्यासाठी आलेल्या कावळ्याची चांगलीच फजिती झाली. त्याला स्वता:चे पंखही गमवावे लागले.kawala3

नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर येथे उंदीर पकडण्यासाठी वापरण्यात येणार्‍या ट्रबल गमला कावळा चिटकला होता. सुमारे चार तास हा कावळा चिटकलेला होता. या ट्रबल गमला एक उंदिर चिकटला होता. त्याला खाण्यासाठी गेलेला हा कावळा या गममध्ये अडकला. स्वतःला सोडवण्यासाठी त्यांने शर्थीने प्रयत्न केले. माञ गमच्या केमिकलने त्याचे मागील पंख पूर्णपणे चिटकूनच गेले होते.

विशेष म्हणजे दहाव्या पिंडाला शिवण्यासाठी कावळयाची विणवणी करणारा माणूस, कावळयाच्या विणवणीला यावेळी दाद ही देत नव्हता. कावळ्याचा मिञ माञ त्यासाठी काव..काव… ही विणवणी करताना वायरीवर दिसून येत होता. सुमारे चार तासानंतर पत्रकार प्रभाकर कुडाळकर यांनी अग्निशमन दलाला माहिती दिली.

वसई-विरारच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी अवघ्या काही मिनिटांतच कावळ्याची त्या ट्रबल गम मधून सुखरूप सुटका केली. माञ गम कावळ्याच्या मागील पंखाला लागल्याने त्याला उडताच येत नव्हतं. अग्निशमन विभागाचे कर्मचारी ह्या कावळ्याला प्राणी संघटनेकडे देवून, डॉक्टराकरवी त्याच्यावर औषधोपचार करणार आहेत. त्याचा पाहुणचार केल्यानंतर त्याची ज्या विभागातून रेस्क्यू केलं आहे. त्याच विभागात त्याला सोडून देण्यात येणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा