नलिनीच्या सुटकेची याचिका फेटाळली

March 29, 2010 9:32 AM0 commentsViews: 2

29 मार्चराजीव गांधी हत्या प्रकरणातील एक आरोपी नलिनी हिच्या सुटकेसंदर्भातील याचिका चेन्नई हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे नलिनीची आता वेळेआधी सुटका होऊ शकणार नाही. गेल्या 19 वर्षांपासून राजीव गांधी हत्याप्रकरणात नलिनी शिक्षा भोगत आहे. नलिनीची तुरुंगातली वागणूक चांगली असून, तिला तिच्या शिक्षेत सूट देण्यात यावी, अशी याचिका चेन्नई हायकोर्टात दाखल करण्यात आली होती. तसेच तुरुंगात तिची प्रियंका गांधींनीही भेट घेतली होती.

close