धावत्या रेल्वेखाली झोपण्याची जीवघेणी पैज, मावळमधला धक्कादायक प्रकार

May 27, 2016 11:10 PM0 commentsViews:

मावळ – 27 मे : मावळमध्ये एका तरुणाचं टोळकं पैशासाठी धावत्या रेल्वेखाली झोपण्याची जीवघेणी पैज लावत असल्याची धक्कादायक घटना समोर आलीये. मावळ रेल्वे स्टेशनवर हा प्रकार दिवसाढवळ्या घडतोय.

maval_train_Accidentएका स्टेशनवरून एक्स्प्रेस वेगात पुढे जातेय आणि रेल्वेलाईन क्रॉस करू पाहणारे गावकरी एक्स्प्रेस पुढे जाण्याची वाट पाहतायत. पण ट्रेन पुढे गेल्यावर उभं राहतं वेगळंच चित्र…गाडी पुढे गेल्यावर या गाडीच्या खाली झोपलेला एक मुलगा अगदी सहजपणे उठतो आणि रूळांच्या बाजूला असणार्‍या आपल्या मित्रांना जाऊन भेटतो. मावळमध्ये तरूणांची एका टोळी पैज लावून असा जीवघेणा स्टंट् करते.

यात स्टंट करणारा रेल्वे ट्रॅकवर झोपून गाडी अंगावरून जाऊ देतो. मावळ रेल्वे स्टेशनवर हा प्रकार दिवसाढवळ्या घडतोय. आठवड्यातले काही दिवस ही टोळी हा स्टंट करते. भरदिवसा होत असलेल्या या प्रकाराकडे रेल्वे प्रशासन आणि पोलीस दुर्लक्ष का करत आहेत असा संतप्त सवाल विचारला जातोय. अनेक दिवस हा प्रकार घडत असताना या टोळीला कोणी रोखलं का नाही हाच सवाल यानिमित्ताने उपस्थित होतोय. हा प्रकार पाहून कोणीही अशा कोणत्याही प्रकारचा स्टंट करू नये असं आयबीएन लोकमतचं सर्व प्रेक्षकांना आवाहन आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा