डोंबिवली स्फोटात मृतांचा आकडा 13 वर

May 28, 2016 1:40 PM0 commentsViews:

डोंबिवली – 28 मे : डोंबिवलीमध्ये प्रोबेस केमिकल कंपनीमध्ये झालेल्या भीषण स्फोटात मृतांचा आकडा 13 वर पोहोचलाय. तर 42 जण जखमी आहेत. त्यापैकी 14 जणांची प्रकृती गंभीर आहे. ज्यांचं नुकसान झालं अशा 1092 जणांचे कालपासून पंचनामे करण्यात आले आहेत. Dombivli rescue

तसंच डोंबिवली स्फोटाच्या चौकशीसाठी समिती नेमली गेली आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी समितीचे प्रमुख आहेत. दरम्यान, ढिगार्‍याखालून थायलिन क्लोराईडचे तीन ड्रम सापडले आहेत. प्रत्येक ड्रमची क्षमता 300 किलो एवढी आहे. आज दुसर्‍या दिवशीही रेस्क्यु ऑपरेशन सुरू असणार आहे. गुरुवारी सकाळी 11.30 च्या सुमारास प्रोबेस कंपनी बॉयलरचा भीषण स्फोट झाला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा