मुंबई पालिका निवडणुकीसाठी युती होणार नाही हे निश्चित -खडसे

May 28, 2016 1:51 PM0 commentsViews:

28 मे : मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी सेना भाजपची युती होईल असं वाटत नाही, असं सुतोवाच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केलं. तसंच शिवसेनेनंही एकला चलो रेची भूमिका अनेक वेळा बोलून दाखवली आहे. भाजपचा तर स्वतंत्र लढण्याचा मानस आहेच, असंही खडसे म्हणाले.khadse_iv

IBN लोकमतचे कार्यकारी संपादक महेश म्हात्रे यांना खडसेंनी एक्सक्लुझिव्ह मुलाखत दिली. यावेळी त्यांनी आपच्या नेत्या प्रिती मेनन आणि अंजली दमानियांवरही टीका केलीय. दमानिया माझ्या मतदारसंघात येऊन गेल्या. त्यांनी आता पुरावे सादर करावेत. मी त्यांच्या पुढल्या आरोपांची वाट पाहतोय, असा टोलाही त्यांनी लगावला.

एकनाथ खडसेंची सविस्तर मुलाखत पाहा आज रात्री 8 वाजता फक्त IBN लोकमतवर


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा