स्पेशल रिपोर्ट : डोंबिवलीत 300 कंपन्यांनी ओलांडली प्रदूषणाची अतिधोकादायक पातळी

May 28, 2016 4:45 PM0 commentsViews:

प्रफुल्ल साळुंखे,मुंबई – 28 मे : राज्यात एमआयडीसी परिसर आणि नागरी वस्ती आता जणू एकत्र झाल्यात. या ठिकाणी प्रदूषण धोकादायक पातळीवर पोहोचलाय. एकट्या डोंबिवलीत 300 कंपन्यांनी प्रदूषणाची अतिधोकादायक पातळी ओलांडली आहे. डोंबिवलीत झालेल्या स्फोटामुळे प्रदूषणाचा विषय पुन्हा ऐरणीवर आलाय.dombivali_pollustion

मुंबई शहर उद्योगनगरी म्हणून ओळखलं जातं. उद्योगामुळे शहरात लोकसंख्या वाढली आणि शहराबाहेर असलेले उद्योग कधी शहराच्या मध्यभागी आले हे कळलंच नाही. मग उद्योग की नागरी वस्ती असा संघर्ष सुरू झाला. त्या संघर्षात प्रदूषित उद्योगांनी भर घातली.
डोंबिवलीच्या औद्योगिक वसाहतीबद्दल बोलायचं झालं तर ही वसाहत 1964 साली स्थापन झाल्यापासून बरेच बदल झाले.

मुंबई शहर आणि परिसरात प्रदूषण धोक्याची पातळी कधीच ओलांडलीय. सायन, चेंबूर, माहुल, डोंबिवली, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी या भागात नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. एकट्या डोबिवलीत तर प्रदूषण 5 ते 7 पटीने वाढलंय. प्रदूषित पाणी शुद्धीकरण करून नदी नाल्यात सोडन प्रत्येक कंपनीला बंधनकारक आहे. पण याकडे डोळेझाक होते हे मात्र नक्की .

राज्यात औद्योगिक प्रदेश उद्योग विभाग, औद्योगिक सुरक्षा, प्रदूषण आणि नगरविकास असा विभागला गेलाय. प्रत्येक विभागाचा कारभार स्वतंत्रपणे चालतोय. हे सगळे विभाग एकत्रपणे निर्णय घेत नाही तोपर्यंत डोंबिवलीमधल्या औद्योगिक समस्या सुटणार नाहीत.

डोंबिवलीतलं प्रदूषण थांबणार कसं ?

- औद्योगिक पाणी प्रक्रिया केंद्राचा विस्तार
- सध्या खांबालपडामध्ये प्रदूषित पाणी सोडलं जातं.
- अतिप्रदूषित पाणी पाईपलाईनद्वारे 14 किलोमीटर लांब सोडण्याची गरज
- कमी प्रदूषित पाणी 30 बीओडी च पाणी 9 किलोमीटर लांब सोडणे

डोंबिवली जल प्रदूषण पातळी
विल्हेवाट ची मानके 5.5ते 9 असायला हवी ती 8.8 वर
जीवशास्त्रीय प्राणवायू 100 असायला हवे ते 995 झालाय
रासायनिक प्राणवायू 250 मर्यादा आहे ती 2368 झालीय
तरंगते पदार्थ प्रमाण 100 असायला हवं ते 486 झालाय

डोंबिवली औद्योगिक वसाहत
- 355 हेक्टर क्षेत्रामध्ये विस्तार
- 7 मोठे, 8 मध्यम, आणि 595 लघु उद्योग प्रकल्प
- 300 कंपन्या रेड झोन (अतिधोकादायक)
- 75 कंपन्या ऑरेंज झोन मध्ये (मध्यम)
- 9 कंपन्या बंद
- 175 कंपन्यांना नोटीस
- 17.5 एम.एल.डी सांडपाण्याची निमिर्ती
- सांडपाणी वाहून नेणार्‍या पाईपलाईन कुचकामी असल्यामुळे वारंवार गळती
- उद्योगांचं सांडपाणी सोडलं जातं खाडीत
 


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा