जाणुन घ्या: फ्रिज साफ करण्याचे घरगुती उपाय

May 28, 2016 6:34 PM0 commentsViews:

फ्रिज हा आपल्या घरातील सर्वात महत्त्वाचा भाग आहे. भाज्या, फळ आणि इतर खाण्याचं सामान ठेवण्यासाठी फ्रिजचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. पण काही वेळा असं होतं की, वापरलेल्या वस्तू काही दिवसांपर्यंत आपण तशाच ठेवतो. मग या साठ्यामुळे त्या खराब होऊन दुर्गंधी पसरू शकते. यामुळे फ्रिज स्वच्छ ठेवणे गरजेचं आहे. फ्रिजमधील कुठल्या वस्तूला दुर्गंध येत असेल तर अशावेळी लिंबू पाण्याचा वापर करून साफ करावे. तसंच फ्रिजमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी न्यूजपेपरचा वापर करावा.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close