हे आहेत जगातील सर्वात महागडे दागिने !

May 28, 2016 6:38 PM0 commentsViews:

प्रत्येक लोकांची आवड आणि त्यांचे छंद हे वेगवेगळ्या प्रकारची असतात. काही लोकांना एखादी वस्तु आवडली की मग ती घेण्यासाठी ते त्याची किंमत बघत नाहीत. महाग असो किंवा स्वस्त असो असेल त्या किंमतीत ती वस्तु विकत घेतात. अशाच काही करोडोंच्या किंमतीत मोजल्या जाणार्‍या महाग दागिन्यांविषयी जाणून घेऊयात.

ब्रियोलेट डायमंड नेकलेस हा जगातील दहावा सर्वात महाग हार आहे. ह्या हारचा मुख्य हिरा जांभळ्या रंगाच्या छटांमध्ये बनलेला आहे. अनेक हिर्‍यांनी मिळुन ह्या हारची शोभा अजून वाढत आहे.

वैलिस सिंपसन हे ब्रेसलेट बघितलं तर ते बिबट्याप्रमाणे दिसेल. कार्टर पेरिसने 1952 मध्ये हे ब्रेसलेट डिझाईन केले होते.या ब्रेसलेटची किंमत 12.4 मिलियन डॉलर एवढी आहे.

हार्ट ऑफ द किंग्डम हा हिरा ह्रदयाच्या आकारात आहे. सर्वात जुना आणि आकर्षक हिरा गेरार्ड कंपनीने बनवलेला आहे. 14 मिलियन डॉलरमध्ये ह्याची किंमत आहे.

बुल्गेरी टु स्टोन डायमंड रिंग दोन प्रकारच्या हिर्‍यांनी बनली आहे. एक हिरा 10.95 कॅरेटचा निळा हिरा तर दुसरा 9.87 कॅरेटचा रंगहीन हिरा वापरला आहे. तसंच चोपार्डचा ब्ल्यु डायमंड रिंग ही जगातील सर्वात महाग दागिन्यांमध्ये मोजली जाते. 9 कॅरेटचे हिरे तर 18 कॅरेटच्या सोन्याचा वापर करुन ही रिंग बनवली आहे. आता ह्या आकर्षक रिंगची किंमत 16.26 मिलियन डॉलर एवढी आहे.

अद्वितीय हिरा म्हणजेच इनकंपरेबल डायमंड. हा 637 कॅरेटचा आहे. सर्वात महाग असलेल्या या हारची किंमत 55 मिलियन डॉलर इतकी असून एका मुलीला हा हिरा हिर्‍यांच्या खाणीत मिळाला होता. त्यावेळेस तो 890 कॅरेटच्या किंमती एवढा असल्याचं सांगितलं जातं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


close