दूध खरेदी दरात वाढ

March 29, 2010 11:26 AM0 commentsViews: 2

29 मार्चसरकारी डेअर्‍यांमध्ये दूध खरेदीचे दर वाढवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण याचा बोजा ग्राहकांवर पडणार नाही.म्हशीच्या दुधाच्या खरेदी दरात साडेचार रूपयांची वाढ तर गाईच्या दुधाच्या दरात 2 रूपयांची वाढ करण्यात आल्याची माहिती दुग्धविकास मंत्री नितीन राऊत यांनी विधानसभेत दिली. मुंबईकरांना चांगलं आणि पुरेसे दूध उपलब्ध व्हावे, यासाठी राज्य शासनाने आता मुंबईतील डेअर्‍या आता मॉडर्न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी राज्य सरकारने एक टास्क फोर्स स्थापन केला आहे. हा टास्क फोर्स येत्या महिन्याभरात इतर राज्यातील चांगला व्यवसाय करणार्‍या डेअर्‍यांचा अभ्यास करून त्याचा अहवाल सादर करणार आहे. आरे दूध डेअरीचे दूध खरेदी दर वाढवण्यात आलेत. 1 एप्रिल पासून ही खरेदी दरात वाढ होणार आहे.

close