चिदंबरम यांना राज्यसभेसाठी महाराष्ट्रातून उमेदवारी

May 28, 2016 6:48 PM0 commentsViews:

p chidambaram3428 मे : काँग्रेसने राज्यसभेसाठी आपल्या उमेदवारांची नावं निश्चित केलीये. राज्यसभेतून काँग्रेसचे 13 खासदार नुकतेच निवृत्त झालेत. रिक्त झालेल्या जागांसाठी काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री पी चिदंबरम यांना महाराष्ट्रातून उमेदवारी मिळणार आहे.

तर कपिल सिब्बल आणि जयराम रमेश यांना अनुक्रमे उत्तर प्रदेश आणि कर्नाटकातून उमेदवारी मिळणार आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या बैठकीत या नावावर शिक्कामोर्तब झालंय. आतापर्यंत आठ नावांची घोषणा करण्यात आलीये. अजून 5 आमदारांची नाव ठरणार आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा