डोंबिवली स्फोटामुळे ‘ती’चं आयुष्य अंधाराच्या ‘उंबरठ्यावर’ !

May 28, 2016 9:54 PM0 commentsViews:

डोंबिवली -28 मे : प्रोबेस कंपनीत झालेल्या भीषण स्फोटात अशा अनेक कथा पुढे येत आहेत. ज्यामुळे अंगावर अक्षरशः काटा येतो. स्नेहा मोरे हिने आपला उजवा डोळा गमावलाय. तिच्या डोळ्याचं बुब्बुळ काचेने चिरलंय. त्यामुळे तिचा डोळा वाचण्याची शक्यता अगदीच 10 टक्के आहे.dom_pkg

ठाण्यात राहणार्‍या स्नेहाने 4 दिवासांपुर्वीचं डोंबिवलीत नव्या नोकरीवर यायला सुरुवात केली. नव्यानेच सुरू झालेल्या करिअरबद्दल तिने अनेक स्वप्नं पाहिली होती. पण एमआयडीसीमध्ये झालेल्या स्फोटात तिच्या बुबुळात काच शिरली. त्यामुळे तिचा उजवा डोळा निकामी झालाय. काचेच्या एका तुकड्यामुळे तिची सगळी स्वप्नं चक्काचूर झालीयेत.

माझा डोळा वाचेल का, असं स्नेहा सतत घरच्यांना विचारतेय, पण या प्रश्नाचं उत्तर कुणाकडेही नाहीये. डॉक्टरांच्या म्हण्ण्यानुसार स्नेहाच्या डोळ्यात काच गेल्यामुळे स्नेहाच्या बुब्बुळात रक्ताची गुठळी झालीय आणि सूजही आलीये. अशा परिस्थितीत तिच्या डोळ्याचं ऑपरेशनही करता येत नाहीये.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा