भोसरी MIDC प्रकरणी एकनाथ खडसे आणखी अडचणीत येण्याची शक्यता

May 29, 2016 12:34 PM0 commentsViews:

442802-424342-khadse

पुणे – 29 मे : पुण्यातल्या जमीन खरेदी प्रकरणी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांच्या अडचणीत आणखी वाढ होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भोसरी इथे एमआयडीसीने संपादित केलेली सुमारे तीन एकर जमीन कोटय़वधी रुपयांचा लाभ मिळवण्यासाठी पदाचा दुरुपयोग करून केवळ 3 कोटी 75 लाख रुपयांमध्ये महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी पत्नी जावयाच्या नावावर खरेदी केल्याने त्यांच्याविरोधात कायदेशीर तक्रार दाखल करणार असल्याची माहिती पुण्यातले बांधकाम व्यावसायिक हेमंत गावंडे यांनी दिली आहे.

खडसे यांच्या कुटुंबियानी घेतलेली जमीन एमआयडीसीच्या असल्याचं खुद्द उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीच सांगितलं. गेल्या 40 वर्षांपासून त्या जागेवर 13 प्लॉटवर कंपन्या उभ्या असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. त्यामुळे या जमिनीची खरेदी कशी काय झाली असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, या प्रकरणी भूखंडाचा आर्थिक व्यवहार करणार्‍या सर्व व्यक्तींची चौकशी होऊन त्यांच्यावर संगमताने जमीन हडपल्या प्रकरणी गुन्हा दाखल होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा