अमिताभ पुन्हा टार्गेट

March 29, 2010 12:15 PM0 commentsViews: 5

29 मार्चकाँग्रेस आणि अमिताभमधील तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. काँग्रेसने आता अमिताभवर पुन्हा टीका केली आहे. अमिताभ गुजरातचा अम्बॅसेडर आहे. त्यामुळे त्याने गुजरात दंगलीबद्दल मुख्यमंत्री नरेंद्र मोदींच्या भूमिकेवर स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काँग्रेसचे प्रवक्ते मनिष तिवारी यांनी केली आहे. अमिताभने मोदींच्या भूमिकेचा निषेध करावा, असेही त्यांनी म्हटले आहे. सी-लिंक प्रकरणापासून काँग्रेसने अमिताभला वादात ओढले. अमिताभ आणि मुख्यमंत्री अशोक चव्हाण एकाच व्यासपीठावर आल्याने काँग्रेस हायकमांड नाराज झाले. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अमिताभ प्रमुख पाहुणा असलेल्या साहित्य संमेलनाच्या समारोपाला जाणेही टाळले.

close