एआयबीच्या तन्मय भट्टची सचिन आणि लतादीदींवर आक्षेपार्ह टिपण्णी

May 29, 2016 9:40 PM0 commentsViews:

video2

29 मे : एआयबी रोस्टच्या माध्यमातून चर्चेत आलेल्या कॉमेडियन तन्मय भट्ट याने पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि लता मंगेशकर यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टिपण्णी केली आहे. त्याच्या या पोस्टवर सोशल मीडियावर अनेकजण संताप व्यक्त करत आहेत.

या व्हिडिओमध्ये विराट कोहली हा सचिनपेक्षा दसपटीने महान क्रिकेटर असल्याच्या विनोद कांबळीच्या कथित वक्तव्याचा धागा पकडत सचिन आणि लता मंगेशकर यांच्या दरम्यानच्या काल्पनिक संवादातून आक्षेपार्ह शेरेबाजी करण्यात आली आहे.

खरं तर ज्यांच्यावर शेरेबाजी करण्यात आली, ते दोघेही भारतरत्न आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात खालच्या पातळीवर केलेल्या कोट्यांमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त होतो आहे.

दरम्यान, बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख, सेलिना जेटली आणि अनुपम खेर यांनी देखील ट्विवरवरुन याबद्दल राग व्यक्त केला आहे. अनुपम खेर यांनी हा व्हिडिओ संतापजनक असल्याची प्रतिक्रिया ट्विटरवरून दिली आहे. तर युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनीही हा प्रकार निषेधार्ह असल्याची प्रतिक्रिया दिली आहे

याआधीही मुंबईत आयोजित केलेलया एका शोवर अश्लीलता पसरवल्याच्या आरोपातून तन्मय भट्टसह अनेक सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा