‘मत कर्जरूपाने द्या…’

March 29, 2010 12:25 PM0 commentsViews: 1

29 मार्च"माझ्या उमेदवारांना आपलं मत कर्जरूपाने द्या… त्याचा उतराई होण्यासाठी माझा जामीन घ्या"…असं आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नवी मुंबईतील मतदारांना केले आहे. नवी मुंबईत मनसेने एकूण 64 उमेदवार रिंगणात उतरवलेत. राज ठाकरे यांनी या 64 उमेदवारांसाठी एकच पत्रक काढले आहे. याच पत्रकात राज यांनी मतदारांना हे आवाहन केले आहे. मुंबई, ठाणे आणि कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांची पूर्वतयारी म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकांकडे पाहिले जात आहे.

close