डोंबिवली स्फोटाप्रकरणी प्रशासनच जबाबदार ?

May 29, 2016 4:31 PM0 commentsViews:

29 मे : डोंबिवलीमध्ये झालेल्या प्रोबेस कंपनी स्फोटाप्रकरणी प्रशासनच जबाबदार असल्याचं समोर आलं आहे. भविष्यात असा मोठा धोका होणार असल्याची माहिती राजू नलावडे यांनी यापुर्वीच प्रशासनाला दिली होती. पण तरीही प्रशासनानं याकडे कानाडोळा केला आणि त्यामुळे डोंबिवलीकरांना इतक्या मोठ्या घटनेला सामोरी जावं लागलं आहे.

35b3548d-8bbb-4488-85b6-fa765dea0646

संपूर्ण डोंबिवलीला हादरवून सोडणार्‍या आणि 12 लोकांचे प्राण घेणार्‍या भीषण स्फोटाबाबत रोजच्या रोज नवी माहिती पुढं येत आहे. या भीषण स्फोटाची सध्या विविध यंत्रणांमार्फत चौकशी सुरू आहे.

दरम्यान, हा स्फोट बॉयलरचा होता, असं आतापर्यंत सांगितलं जात होतं. मात्र, कंपनीत बॉयलरच नव्हता, असं कंपनीच्या कर्मचार्‍यांचं म्हणणं आहे. रासायनिक प्रक्रियेसाठी वापरण्यात येणार्‍या रिऍक्टरमध्ये हा स्फोट झाला होता, अशी माहिती एमआयडीसीच्या अग्निशमन दलाचे अधिकारी दिलीप गुंड यांनी दिली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा