खडसे दाऊद कॉल प्रकरणावर 6 जूनला सुनावणी

May 30, 2016 1:27 PM0 commentsViews:

30 मे : महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि दाऊद इब्राहिम फोन कॉल्स प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी, अशी याचिका हायकोर्टात आज केली आहे. आता ही याचिका दाखल करून घ्यायची की नाही, यावर 6 जूनला सुनावणी होणार आहे. Khadse12

हॅकर मनिष भंगाळेनं ही याचिका केली आहे. दाऊदच्या कॉल रेकॉर्ड् हॅक केल्याचा दावाही मनिषनंच केला होता. मनिष भंगाळेनं दाऊदच्या घरचा फोन हॅक केला होता. यामध्ये दाऊदच्या फोनमध्ये एकनाथ खडसेंचा मोबाईल नंबर झळकला होता असा गंभीर आरोप आपच्या नेत्या प्रीती मेनन यांनी केला होता.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा