…आणि महिलेनं जॅग्वार गाडीचा केला चुराडा !

May 30, 2016 4:24 PM0 commentsViews:

चीन – 30 मे : पैशांच्या वादावरून एका महिलेनं एका महिलेनं आपल्या रेंज रोव्हर गाडीने जॅग्वार गाडीला ठोकून ठोकून चुराडा केल्याची घटना घडलीये. आश्चर्य म्हणजे रस्त्यावरच्या लोकांनी याचा विरोध न करता महिलेला हे कृत्य करण्यात मदत केली. दक्षिण पूर्व चीनमध्ये ही अजब घटना घडलीय. या महिलेनं एकूण 6 वेळा जॅग्वारला धडक देऊन ती गाडी बाजूला केली.

jagvar_ chinaझालं असं की, जॅग्वारच्या मालकाशी या महिलेचा पैशांवरून वाद झाला होता. त्यामुळे जॅग्वारच्या मालकानं मुद्दामहुन त्याची गाडी रेंज रोव्हरपुढे लावून ठेवली. याचा या महिलेला इतका राग आला की तिनं या गाडीचं नुकसान करत तिला बाजूला केलं. या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय, असं वृत्त आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा