चंद्रपुरात 63 फुटी हनुमान

March 29, 2010 12:34 PM0 commentsViews: 4

29 मार्चचंद्रपूर शहराजवळ चिचपल्ली इथे 63 फूट उंच हनुमानाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात येणार आहे. हनुमान जयंतीच्या दिवशी हा सोहळा पार पडणार आहे. प्राणप्रतिष्ठापनेनंतर क्रेनने या मूर्तीची पूजा केली जाणार आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने भागवत निकेतन आश्रमामध्ये श्री भागवत संस्कृती सेवा प्रतिष्ठानतर्फे वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुजरातवरून आलेल्या महाराजांनी इथे दीपपूजा केली. यावेळी जवळपास 1 हजार दीप प्रज्वलित करून पूजा करण्यात आली.

close