पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी तरुणाचा पेटवून घेण्याचा प्रयत्न

May 30, 2016 5:51 PM0 commentsViews:

औरंगाबाद – 30 मे : एका तरूणानं पाण्यासाठी अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र वेळीच पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून ताब्यात घेतलं. सुभाष साठे असं या तरुणाचं नाव आहे.sathe_abad

वैजापूर तालुक्यातील हा तरूण असून त्याचं नाव सुभाष साठे आहे. गावातील पाणी टंचाईबद्दल त्याला पालकमंत्री रामदास कदम यांना भेटायचे होते.  मात्र त्याला पालकमंत्र्यांना भेटू दिले जात नव्हते. गावातील पाणी योजनेचे पैसे अधिकार्‍यांनी खाल्ले त्यामुळे त्याच्या गावात पाणीटंचाई निर्माण झाली असा या तरुणाचा आरोप आहे. संतापलेल्या संतोष साठेनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर स्वता:ला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा