वादात सापडलेले एकनाथ खडसे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला ?

May 30, 2016 6:22 PM0 commentsViews:

30 मे : दाऊद कॉल प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट
घेतल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ मुख्यमंत्री आणि खडसेंमध्ये चर्चा चालल्याचं कळतंय.

khadse_to_cm_letterआम आदमी पक्षाच्या नेत्या प्रिती मेनन यांनी पत्रकार परिषद घेऊन अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा कॉल एकनाथ खडसेंना आला होता असा गंभीर आरोप केला होता. त्याचा पुरावा म्हणून हॅकर मनिष भंगाळे याने दाऊदच्या घरचा फोन हॅक केला होता. दाऊदच्या घरच्या फोनच्या कॉल लॉगमध्ये खडसेंचा नंबर होता असा दावा केलाय. हे प्रकरण आता कोर्टात गेलंय. तसंच या प्रकरणाची दिल्लीच्या नेतृत्त्वाने दखल घेतलीये. खडसेंच्या या कॉल लॉग प्रकरणाचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केलं होतं. याआधीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीही खडसेंची पाठराखण केली होती. तसंच एकनाथ खडसेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून आपला खुलासा दिला होता. आज खडसेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती समोर येत आहे. आता या प्रकरणावर मुख्यमंत्री काय भूमिका मांडता हे पाहण्याचं ठरेल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा