नाशिकमध्ये तस्करांच्या तावडीतून 8 कासवांची सुटका

May 30, 2016 6:46 PM0 commentsViews:

नाशिक – 30 मे : दारणा नदीपात्रातून कासव काढून त्याची तस्करी करण्याचा प्रकार उघड झाला आहे. स्थनिक नागरिकांच्या सतर्कतेमुळे दुर्मिळ जातीच्या लहान मोठ्ठया 8 कासवांना जीवदान मिळालं.nsk_tartl

दारणा नदी पात्रातील पाणी कमी झाल्यानं, कासव तस्करांनी चेहडी भागातील नदीपात्रातून 8 कासव पळून नेण्याचा प्रयत्न करत होते. यातील तीन कासव 50 ते 70 किलो वजनाची आहे. त्यांचे वय 150-200 वर्षांच्या आसपास आहे. दुर्मिळ जातीची या कासवांची किंमत लाखो रुपये आहे. या कासवांचा वापर जादूटोण्यासाठी वापरल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे. ह्या कासवांना आता वनधिकार्‍यांच्या उपस्थितीत नदीपात्रात सोडण्यात आलं आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा