लोअर परळ स्टेशनजवळ रेल्वेचा डबा घसरला, वाहतूक विस्कळीत

May 31, 2016 9:15 AM0 commentsViews:

31 मे :  पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालीय. लोअर परळ स्टेशनजवळ एक रिकामा डबा घसरल्यामुळे वाहतूक कोंडी झालीये.
सर्व स्लो मार्गावरच्या गाड्या फास्ट ट्रॅक्सवर वळवण्यात आल्या आहेत. दादर ते चर्चगेट या पट्‌ट्यात सर्वात जास्त परिणाम झालाय. सर्व गाड्या जलद मार्गावर वळवल्यामुळे तिथेही गाड्यांचा खोळंबा झालाय.

lp_train_accidentलोअर परळजवळच्या यार्डातून बाहेर काढताना एक रिकामा डबा मध्यरात्री 2 वाजता घसरला. हा डबा खाली असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळ डबा घसरल्यामुळे 1 आणि दोन प्लॅटफॉर्मवर वाहतूक ठप्प झालीये. हा डबा काढण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. 11 वाजेपर्यंत काम पूर्ण होण्याची अपेक्षा आहे, असं पश्चिम रेल्वेच्या जनसंपर्क अधिकार्‍यांना सांगितलं. ऐन सकाळी गर्दीच्या वेळी अपघात झाल्यामुळे दादरहुन चर्चगेटकडे कामासाठी जाणार्‍या चाकरमान्याचे हाल झाले. अनेकांना उशिरा ऑफिसवर पोहोचावं लागलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा