नाशिक मनसे शहराध्यक्ष अटकेत

March 29, 2010 12:57 PM0 commentsViews: 3

29 मार्चमनसेचे इगतपुरी शहराध्यक्ष सोमनाथ भोंडवे यांना पोलिसांनी अटक केली आहे. मुलींच्या छेडछाडी प्रकरणी अशोक खातळ यांनी त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्यावर इगतपुरी पोलिसांनी त्यांना अटक करून समज देवून सोडून दिले होते. मात्र सुटका झाल्यावर ते जाब विचारण्यासाठी खातळांकडे गेले. तिथे त्यांना करण्यात आलेल्या मारहाणीत खातळांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी इगतपुरी पोलिसांनी मनसे शहराध्यक्ष भोंडवे यांच्यासह एकाला ताब्यात घेतले आहे, तर तिघे फरार आहेत.

close