नाराज महादेव जानकरांचं मुंबईत शक्तीप्रदर्शन ?

May 31, 2016 9:50 AM0 commentsViews:

31 मे : भाजपसोबत जाऊनही मंत्रिपदाची माळ महादेव जानकरांच्या गळ्यात पडण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळेच अहिल्याबाई होळकर यांच्या जयंती निमित्तानं मुंबईत शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी जानकरांनी केली आहे.

jankar newsनेहमी चौंडी इथं हा कार्यक्रम घेणार्‍या जानकरांनी आता मुंबईत याचं आयोजन केलंय. तर चौंडी इथं राम शिंदे यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलंय. भाजपची धनगर आरक्षणाची घोषणा फक्त हवेतच विरलीये. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर दबाव आणण्याचा निर्णय धनगर नेत्यांनी केलाय.

पण धनगर समाजाचे नेते राम शिंदे यांनी वसुंधरा राजे यांच्या उपस्थितीत चौंडी इथं कार्यक्रमाची जोरदार तयारी केलीय तर त्याला शह देत महादेव जानकर यांनी हा कार्यक्रम चौंडीच्या ऐवजी मुंबईत घेण्याचं ठरवलंय.

मुंबईतल्या आझाद मैदानात मोठं शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केली आहे. त्यासाठी पकंजा मुंडे,राजू शेट्टी, रामदास आठवले, दिवाकर रावते अशा भाजपला लक्ष्यं करणार्‍या नेत्यांना कार्यक्रमाला बोलावून येथून पुढं आपण स्वस्थ बसणार नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केलाय. चौंडी इथं होणार्‍या कार्यक्रमाशी फारकत घेऊन जानकरांनी अधिक आक्रमकपणे शक्तीप्रदर्शन करण्याची तयारी केलीय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा