खडसे कॅबिनेट बैठकीला राहणार गैरहजर, जळगावात करणार शक्तीप्रदर्शन ?

May 31, 2016 10:52 AM0 commentsViews:

khadse on kanada31 मे : वादाच्या गर्तेत अडकलेले महसूलमंत्री एकनाथ खडसे आज जळगावला रवाना झाले आहे. आजच्या कॅबिनेट बैठकीला खडसे गैरहजर राहणार आहे. खडसे जळगावात आज शक्तीप्रदर्शन करणार असल्याचं बोललं जातंय.

सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन खडसे जळगावला रवाना झाल्याचं कळतंय. त्यामुळे आज कॅबिनेट बैठकीला खडसे उपस्थित राहणार नाहीत.

जळगावात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने खडसे गेलेत असं सांगितलं जातंय. पण सततच्या होणार्‍या आरोपांमुळे खडसे नाराज आहेत. त्यात खडसेंचं महसूलमंत्री पद काढण्यात येऊ शकतं. त्यामुळे खडसे आज जळगावात शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा