वसई रेल्वे स्टेशनवर गटाराचा स्लॅब कोसळला,15 प्रवाशी जखमी

May 31, 2016 1:05 PM0 commentsViews:

वसई – 31 मे : वसईत गटाराचा स्लॅब कोसळून 15 रेल्वे प्रवाशी गटारात पडल्याची घटना घडलीये. वसईच्या आनंद नगर परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 जवळही घटना घडली आहे. जखमींमध्ये 2 महिलांचा समावेश आहे. जखमींवर रवी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.vasai

पश्चिम रेल्वेवर लोअर परळ स्टेशनजवळ एक्स्प्रेसचा डबा घसरला होता. त्यामुळे लोकल उशिराने धावत होत्या. आज सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास वसईच्या आनंद नगर परिसरातील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर 20 ते 25 प्रवासी लोकलची वाट पाहात होते. आणि अचानक हा स्लॅब कोसळला आणि15 रेल्वे प्रवाशी गटारात पडले. यात 2 महिलांचाही समावेश आहे. जखमींना वसईच्या रवी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले आहे. यात 2 प्रवाशी गंभीर जखमी आहेत. हा स्लॅब कमकुवत असल्यामुळे ही दुर्घटना घडली. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्मला अगदी लागूनच हे गटार आहे. या गटारावर ला आतून कोणतच सपोर्ट नव्हता. त्यातच या गटारावर पायर्‍या देखील बनवल्या होत्या. स्थानिक परसारातील लोकांनी गटारात पडलेल्या या लोकांना बाहेर काढलं. सुदैवाने कोणतीच जीवितहानी झाली झाली नाही. हा स्लॅब टाकून केवळ वर्ष ही उलटले नाही. त्यामुळे ठेकेदारावर कारवाई कण्याची मागणी समोर आली आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा