आता सर्व मुक्ताईवर सोपवलं -एकनाथ खडसे

May 31, 2016 2:05 PM0 commentsViews:

जळगाव – 31 मे : एकनाथ खडसे यांनी अखेर महसूल खातं जाण्याच्या शक्यतेवर आणि इतर आरोपांवर आपलं मौन सौडलं आहे. माझ्या मागे कोणीही कितीही टिव-टिव किंवा काव-काव केली तरी माझ्यापाठी मुक्तीईचा आशिर्वाद आहे. त्यामुळे मी सर्व मुक्ताईवर सोपवलं आहे अशी प्रतिक्रिया खडसे यांनी दिली.

442802-424342-khadseएकापाठोपाठ एक झालेल्या आरोपांमुळे महसूलमंत्री एकनाथ खडसे संतप्त झाल्याचं दिसतंय. आज मुंबईत होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीला हजर न राहता, ते तडकाफडकी मुक्ताईनगरला निघून गेले तेही साध्या गाडीतून…खडसेंनी लाल दिव्याची गाडी टाळल्यामुळे अनेक तर्कवितर्कांना उधाण आलंय. यावर खडसेंनी खुलासा केलाय.गेल्या एक महिन्यापासून मी लाल दिव्याची गाडी वापरत नाही आहे. माझ्या पाठीला त्रास असल्यामुळे मी लाल दिव्याची गाडी वापरत नाही असं खडसेंनी सांगितलं.

आज एकनाथ खडसे हे जळगावातील कोथळी मुक्ताईनगर येथे संत मुक्ताई मंदिर जीर्णोद्धाराच्या भूमीपूजन कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. यावरून खडसेंवर होणार्‍या आरोपांमुळे खडसे नाराज असल्याचं स्पष्ट होतंय. त्यामुळेच ते आजच्या कॅबिनेट बैठकीत उपस्थित राहणार नाहीत. शिवाय आज जळगावमध्ये खडसेंकडून शक्ती प्रदर्शन केलं जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

एकनाथ खडसेंवर आरोप

- दाऊदच्या घरच्या नंबरवरून खडसेंच्या फोनवर कॉल आल्याचे आरोप
– मात्र भोसरी एमआयडीसी जमीन खरेदीचं प्रकरण गंभीर
– एमआयडीसी जमीन खरेदीत खडसेंच्या घरच्यांची थेट नावे
– एमआयडीसी प्रकरणात गुन्हाही दाखल होऊ शकतो
– गुन्हा दाखल होऊ नये यासाठी खडसेंच्या हालचाली, मुख्यमंत्र्यांची भेट
– चौकशी पूर्ण होईपर्यंत खडसेंची महसूलची जबाबदारी जाणार?
– या सर्व प्रकरणाची केंद्रीय नेतृत्वानं घेतली गंभीर दखल
– सर्वांचा विरोध पत्करून घरामध्येच पद वाटपामळे पक्षनेतृत्व नाराज


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा