दुष्काळग्रस्त मराठवाड्यात अहिल्याबाईंनी बांधलेल्या बारवांना आजही पाणीच पाणी !

May 31, 2016 3:18 PM0 commentsViews:

31 मे : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती…अहिल्याबाई यांनी आपल्या कार्यकाळात अनेक धार्मिक सामाजिक पुण्याची कामं केली…खास करून त्यांनी केलेल्या पाण्याच्या नियोजनाची दखल आजही घेतली जातेय. त्यांनी देशभरात पाण्याची गरज ओळखून बारवं बांधली. मराठवाड्यात त्यांनी बांधलेल्या बारवांना दुष्काळी काळातही पाणी आहे.

barawa3अंबड तालुक्यातील कावंदी बारवंमध्ये मात्र तरूण मस्तपणे पोहण्याचा आनंद घेत आहेत. याला कारणीभूत आहेत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर…अहिल्याबाई यांनी 18 व्या शतकात पाण्याचं महत्व ओळखलं होतं…आणि त्यांनी दुष्काळावर मात करण्यासाठी ठिकठिकाणी बारवं बांधली..त्यांनी बांधलेल्या बहुताशं बारवांना पाणी आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली बारवं वैज्ञानिक सिद्धांताचा आधार घेवून बांधल्याचं अभ्यासक सांगतात.

अहिल्याबाई होळकर यांनी बांधलेली बारवं हे जवळपास 18 व्या शतकातील आहेत…त्यांच्यानंतरही अनेकांनी बारवं बांधली. अंबड परिसरातील बारवं अहिल्याबाईंनी बांधली कारण तो प्रदेश त्यांना परगणा म्हणून मिळालेला होता. त्याठिकाणी त्यांना आपली बाजारपेठ बसवायची होती..अंबडला नदी किंवा तलाव नाहीत म्हणून त्यांनी पाच बारवं बांधली.जेणेकरून बाजारपेठ भरभराटीस यावी. त्याकाळी अंबडची तहाण अहिल्याबाईंनी बांधलेल्या बांरवांमधूनच भागायची

अहिल्याबाई यांनी पाणी संवर्धनाचं केलेलं काम..धार्मिक मंदिरांची केलेली स्थापणा यामुळंच त्यांना पुण्यश्लोक ही पदवी देण्यात
आली. त्यांनी बांधलेली बारवं उत्तम वास्तूशात्राचा नमुनाच आहते..आकर्षक पायर्‍या…नक्षिकाम चोकोणी आणि षटकोणी बारवं आणि प्रत्येक बारवाच्या ठिकाणी मंदिराची स्थापना केली. जेणेकरून नागरीकांना पाण्याचं पावित्र्य राखावं हा त्या मागचा हेतू…

आज आपण दुष्काळामुळं शहाणे झालो आहोत..आणि पाण्याचे जमिनीखालील प्रवाह शोधत आहोत.अहिल्याबाई यांनी अठराव्या
शतकातच ते शोधले. नुसते शोधले नाही तर ते बाराही महिने जिवंत राहतील याची काळजी घेतली. आजही मराठवाड्यातील अहिल्याबाई यांनी बांधलेले बारवांना पुर्नजीवन दिले तर आपल्याला बर्‍यापैकी दुष्काळाचा सामना करता येईल.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा